UGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा


UGC Net Exam 2021 Update at ugcnet.nta.nic.in – केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे केले जाते. रमेश पोखरियाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) वतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात. विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

2 मे पासून ऑनलाईन परीक्षा

रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. (UGC-NET Exam Date) जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाऊ लागली.

यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.

The post UGC NET परीक्षेची तारीख जाहीर- आजपासून अर्ज करा appeared first on महाभरती...

Source linkPost Views:
12Source link